icon icon

FREE SHIPPING above Rs.350!*

Author
Nobel Hygiene

‘‘ताऊ बाथरूममध्ये इतका वेळ काय करतात… याचं कुतूहल माझ्या मनात होतं. दर दोन तासांनी ते कमीत कमी पंधरा मिनटं बाथरूममध्ये असायचे. और अंदर से बिलकूल आवाज नही | एकदम गुप सन्नाटा…’’ वयाच्या चौसष्टाव्या वर्षी हे जग सोडून गेलेल्या आपल्या ताऊजींच्या या विचित्र सवयीबद्दल शर्मिला सांगत होती. 

‘‘लघवी अडकणं, लघवी अटकाव हा एक आजार आहे हे दुर्दैवानं आमच्यापैकी कुणालाच तेव्हा माहीत नव्हतं आणि त्यांनीही संकोचापोटी ते आम्हाला कधी सांगितलं नाही. त्यानंतर थोड्या काळातच ते आम्हाला सोडून गेले. आम्हाला त्यांच्या या आजाराबद्दल काही समजलं असतं तर आम्ही लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय  केले असते.’’ एवढं बोलून ती थांबली.

लघवी अटकाव या आजारात मूत्राशय पूर्ण रिकामं होत नाही. परिणामी, या आजाराचा सामना करणाऱ्या रुग्णांना नुकतंच लघवीला जाऊन आल्यानंतरही लगेचच लघवीला वारंवार जावे लागणे  सारखं सतत वाटत राहतं. वारंवार बाथरूमच्या फेऱ्या मारून आणि खूप प्रयत्न करूनही, काही लघवी मूत्राशयात नेहमी शिल्लक राहतेच.

लघवी अटकाव या आजाराचे दोन प्रकार आहेत: (There are two types of urinary retention:)

  • तीव्र लघवी अटकाव: या प्रकारचा मूत्र अटकाव जीवघेणा असू शकतो. हा आजार अल्पकालीन असला तरी तो अचानक होतो. मूत्राशय पूर्ण तुंबलेलं असलं तरीही लघवी अडकून राहिल्यामुळं लघवीला होत नाही.
  • दीर्घकालीन लघवी अटकाव : या प्रकारचा लघवी अटकाव हळूहळू बळावत जातो त्यामुळं तो दीर्घकालीन आहे. या आजारात तुम्हाला लघवीला होते पण मूत्राशय पूर्ण रिकामं, साफ होत नाही.

लघवी अटकावाची लक्षणं (Urinary retention symptoms)

लघवी अटकावाची लक्षणं ही मूत्राशयाची क्षमता, आजाराची तीव्रता आणि आजाराचं मूळ कारण यांप्रमाणे बदलू शकतात. तीव्र मूत्र अटकावामध्ये सर्वसामान्यपणे पुढील लक्षणं दिसतात…

  • मूत्राशय पूर्ण साफ न होणे 
  • ओटीपोटात तीव्र वेदना किंवा 
  • ओटीपोटाला सूज येणं.

दीर्घकालीन लघवी अटकावाची लक्षणं:

  • लघवी करताना त्रास होणं 
  • खूप कमी प्रमाणात आणि थांबूनथांबून लघवीला होणं.
  • पूर्ण मूत्रविसर्जन न होताच लघवी थांबणं.
  • दिवसातून आठपेक्षा जास्त वेळा लघवीला होणं
  • लघवी होण्यासाठी ताण द्यावा लागणं.
  • लघवी गळती होत राहणं 

स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये लघवी अटकाव कशामुळं होतो / लघवी कमी होण्याची कारणे  ? (What Causes Urinary Retention in Males and Females?)

आजाराची सुरुवात असेल म्हणजेच आजार प्राथमिक अवस्थेत असेल, बळावलेला नसेल तर लघवी अटकावावर घरच्या घरी उपचार करता येतात. त्यासाठी सगळ्यात आधी या आजाराची कारणं बघू या.

स्त्रिया आणि पुरुष यांच्यात या व्याधीची अनेक कारणं असू शकतात. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे आहेत.

  • वाढत्या वयामुळं मूत्राशयाच्या स्नायूंची ताकद कमी होऊन ते कमजोर होतात. 
  • लघवीच्या मार्गात मूतखडा झाल्यामुळं किंवा तिथं उतींची अंतर्गत वाढ झाल्यामुळं अडथळा निर्माण होतो.
  • प्रोस्टेटला सूज येणं (प्रोस्टेटायटीस), प्रोस्टेट ग्रंथीची अतिरिक्त वाढ होणं (सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया) किंवा प्रोस्टेट कॅन्सर असे आजार झाल्यामुळं मूत्राशयाच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो.
  • काही ठरावीक औषधांचा मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होतो.
  • अपघात, गर्भधारणा, बाळंतपण अशा गोष्टींमुळं होणारे शारीरिक आघात.
  • मूत्राशय जास्त प्रमाणात ताणलं जातं.
  • औषधांचा आणि शस्त्रक्रियांचा दुष्परिणाम होतो.
  • मूत्राशय खराब झाल्यामुळं लघवी बाहेर पडू देण्यासाठी ते आकुंचन पावत नाही.
  • लघवीच्या मार्गात संसर्ग होतो.

लघवी अटकावाची जोखीम (Risk factors of Urinary Retention)

लघवी अटकावाची समस्या कुणामध्येही उद्भवू शकते तरी तिच्यातले जोखीम घटक लिंगपरत्वे आणि वयपरत्वे बदलतात. प्रोस्टेटसंबंधित आजारांमुळं मूत्र अटकाव या आजाराचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. तसंच वाढत्या वयात हा आजार होण्याची शक्यता वाढते.

लघवी अटकावाच्या बाबतीतले आणखी काही जोखीम घटक पुढीलप्रमाणे आहेत…

  • लघवीच्या मार्गात संसर्ग होणं.
  • गुंतागुंतीची प्रसूती किंवा बाळंतपण होणं.
  • दुखापतीमुळं किंवा निष्क्रियतेमुळं मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होणं.
  • मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, एड्‌स अशा आजारांमुळं मज्जासंस्थेला हानी पोहोचून त्यामुळं काही व्याधी होणं.

सौम्य लघवी अटकावाला प्रतिबंध कसा करावा किंवा त्याचा सामना कसा करावा? (How to Manage or Prevent Mild Urinary Retention)

लघवी अटकावाच्या गंभीर आजारात जिथं वैद्यकीय उपचार नेहमी अत्यावश्यक असतात तिथं सौम्य लघवी अटकावाचा सामना करण्यासाठी अनेक नैसर्गिक घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात.  

खरंतर तुमच्या मूत्राशयावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात तुम्हाला मदत करण्याची क्षमता असलेला एक व्यायाम आहेहा विलक्षण पराक्रम कोणता व्यायाम गाजवू शकतो हे समजून घेण्यासाठी संपूर्ण लेख लक्षपूर्वक नीट वाचा.

लघवी अटकावावरचे नैसर्गिक घरगुती उपाय लघवी साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध  (Natural Remedies for Urinary Retention)

लघवी अटकावावरचे काही नैसर्गिक घरगुती उपाय / उपचार / लघवी साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध बघू या…

१) वेदनाशामक

मूत्राशयात लघवी तुंबून राहिल्यामुळे तुमच्या शरीराच्या खालच्या अर्ध्या भागात खूप अस्वस्थता जाणवते आणि तीव्र वेदना होतात. लघवी अटकाव हा बरेचदा सूज आल्यामुळं आणि संसर्गामुळं होतो. अशा परिस्थितीत वेदना होणं, पोटात गोळा येणं, अस्वस्थता जाणवणं यांपासून ताबडतोब आराम मिळावा म्हणून तुम्ही तातडीच्या वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याविना तात्पुरती औषधं घेऊ शकता.

पेपरमिंट तेल

 जखम किंवा घाव भरून काढणारं, वेदना कमी करून त्यांच्यापासून सुटका करणारं म्हणून पेपरमिंट तेल आपल्या सगळ्यांना परिचित आहे. प्राचीन काळातही लघवी अटकावाच्या आजारावरच्या उपचारांत या तेलाचा उपयोग केला जायचा.

मूत्रविसर्जनाला उत्तेजन देण्याकरता टॉयलेटच्या पाण्यात (म्हणजे नेमकं कुठल्या पाण्यात?) पेपरमिंट तेलाचे काही थेंब टाकावेत. असं केल्यामुळं तेलाची वाफ विटपाला म्हणजेच गुदद्वार आणि लिंग या गुप्तांगांच्या मध्ये असणाऱ्या पातळ त्वचेला लागेल आणि त्यामुळं लघवीचा प्रवाह वाढायला मदत होईल. अशा प्रकारे लघवी अटकावाच्या आजारात पेपरमिंट तेलाचा वापर करणं फायदेशीर ठरेल.

कर्णफुली (दांडेलिअन)

 कर्णफुली (दांडेलिअन) हे एक वन्य पिवळी फुलं येणारं रानटी झुडूप म्हणजे लघवी साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. मूत्राशयाचा दाह आणि लघवी अटकाव या आजारांवर उपचार करण्यासाठी याचा वापर करावा. जवळच्या औषधालयातून दांडेलिअन चहा आणून तो बायकांनी दिवसातून दोनदा घेतला तर त्याचा चांगला परिणाम होतो.

खाजकुयली

वैद्यकीय भाषेत अर्टिका डायओइका म्हणून ओळखली जाणारी खाजकुयली ही वनस्पती ज्यात लघवी अटकावाचाही समावेश होतो अशा वाढलेल्या प्रोस्टेटच्या विकारात आराम मिळावा म्हणून वापरतात.
५) किगल व्यायाम

मूत्राशय आणि लघवी यांवर नियंत्रण मिळवण्यासाठीचा सर्वोत्तम आणि सर्वात जास्त प्रभावी घरगुती उपाय म्हणजे किगल व्यायाम.

वाढत्या वयात स्नायूंवरचं नियंत्रण गमावल्यामुळं एखाद्या व्यक्तीला लघवी अटकाव होत असेल तर अशा वेळी तुमच्या मूत्राशयाच्या किंवा आतड्यांच्या हालचालींवर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी किगल व्यायाम तुम्हाला मदत करू शकतात.

आता तुम्ही म्हणाल की, हे सगळं ठीकये… पण किगल व्यायाम कसा करायचा…

काळजी करू नका… तुम्ही फक्त पुढं वाचत राहा…

  1. आरामात खाली बसा किंवा झोपा आणि अशी कल्पना करा की, तुम्ही लघवी दाबून धरलीये किंवा गॅस बाहेर पडण्यापासून रोखून धरलाय. आत्ता हे करताना तुम्ही जे स्नायू वापरले ते तुमच्या ओटीपोटाच्या खालच्या बाजूचे स्नायू म्हणजेच पेल्व्हिक फ्लोअर मसल्स आहेत.
  2. एकदा तुम्हाला हे स्नायू ओळखता आले की ते वर उचला आणि रोखून धरा. सोडून देण्यापूर्वी तशाच आकुंचन पावलेल्या स्थितीत ते साधारण तीन ते पाच सेकंदांपर्यंत धरून ठेवावेत. 
  3. हाच व्यायाम पुन्हा करण्याआधी तुमच्या ओटीपोटाला तीन ते पाच सेकंदांची विश्रांती द्यावी.
  4. आकुंचन-प्रसरणाचा हा व्यायाम दहा वेळा करावा. असा एक संच याप्रमाणे दिवसातून तीन संच पूर्ण करावेत. 

Product Recommendations

लघवी अटकावाला प्रतिबंध करण्यासाठी घरगुती उपाय / लघवी साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध (Home remedies to prevent urinary retention)

जर तुम्हाला हलकासा लघवी अटकाव जाणवत असेल आणि तो टाळण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल तर तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात काही बदल करणं फायदेशीर ठरू शकतं.

  • लघवी मूत्रमार्गातून सहज बाहेर पडावी आणि लघवीच्या मार्ग निरोगी राहावा यासाठी भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ प्यावेत.
  • लघवी नियंत्रण करणाऱ्या स्नायूंना बळकट करणाऱ्या ओटीपोटाच्या व्यायामांचा सराव करावा. 
  • मूत्राशयाला त्रास देणारी कॅफीन, अल्कोहोल यांसारखी पेयं पिऊ नयेत आणि चमचमीत मसालेदार, आम्लयुक्त पदार्थ खाऊ नयेत.
  • आहारात तृणयुक्त पदार्थांचा समावेश करून, भरपूर पाणी पिऊन आणि नियमित व्यायाम करून बद्धकोष्ठता टाळावी.
  • जेव्हा लघवीला येईल तेव्हा लगेच लघवी करायला जावे. खूप वेळ लघवी दाबून धरू नये.

लघवी अटकाव उपचार (Urinary Retention Treatment)

लघवी अटकाव कशामुळं झाला आहे यावर त्याचे उपचार अवलंबून आहेत. तुमचे डॉक्टर तुम्हाला जे उपचार सुचवतील त्यांपैकी काही बघू या.

  • लघवीचा मार्ग संसर्ग झाला असेल तर त्याच्याशी संबंधित प्रतिजैविकं घेणं.
  • काही शारीरिक उपचार आणि ओटीपोटाचा खालचा भाग मजबूत करण्यासाठी ओटीपोटाचे व्यायाम करणं.
  • लघवी अटकावाला कारणीभूत ठरणारी काही औषधं तुम्ही घेत असाल तर ती बदलणं.
  • मूत्राशयातून लघवीचा निचरा करण्यासाठी मूत्राशयात कॅथेटरची नळी घालणं.
  • प्रोस्टेटशी संबंधित आजारांवरचे औषधोपचार करणं, शारीरिक उपचार करणं आणि शस्त्रक्रिया करणं.
  • भविष्यात संभवणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी लघवीच्या मार्गात स्टेंट म्हणजे अरुंद नळी बसवणं.

तुमचे डॉक्टर जे अनेक उपचार करतील त्यांपैकी कारणावर आधारित काही निवडक उपाय आपण पाहिले.

हे सगळं वाचल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न आला असेल कीजर हे असं करायचं तर डॉक्टरांकडं नेमकं कधी जायचं? (When to see a doctor?)

या प्रश्नाचं साधंसरळ उत्तर असं आहे की, ज्या क्षणी तुम्हाला लघवी अटकावाची लक्षणं जाणवतील त्या क्षणी तुम्ही डॉक्टरांकडं गेलं पाहिजे. एखाद्या आजाराचं त्याच्या प्राथमिक अवस्थेत निदान झालं आणि लगेचच उपचार सुरू केले तर रोग पूर्ण बरा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते आणि परिस्थिती गंभीर होऊ न देता आजार आटोक्यात आणता येतो.

कळीचे (महत्त्वाचेमुद्दे (Key Takeaways)

लघवी अटकावावरच्या इथं सांगितलेल्या कोणत्याही नैसर्गिक उपचारानं तुमचा आजार वाढत असेल तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ते उपचार लगेचच थांबवा आणि डॉक्टरांकडं जा. जर तुम्ही आजारी असाल आणि औषधोपचार घेत असाल तर तुम्ही हे उपाय करावेत असं आमचं म्हणणं नाही.

वर्षानुवर्षं लोकांना या उपायांचा उपयोग झाला आहे पण त्यांना कोणताही ठोस शास्त्रीय आधार किंवा पुरावा नाही… या गोष्टीचा विचार करून कायम सावधगिरी बाळगा.

वारंवार विचारले गेलेले प्रश्न (FAQs:)

) लघवी अटकावावर मी घरच्या घरी उपाय कसा करू शकतो? (How can I fix urinary retention at home?)

लघवी अटकावावरचा उपाय हा त्याच्या कारणावर आणि परिस्थितीच्या गांभीर्यावर अवलंबून असतो. आजाराची तीव्रता कमी असेल तर तुम्ही पुढील उपाय करू शकता…

  • मूत्राशयावरचं नियंत्रण सुधारण्यासाठी किगल व्यायामाचा सराव करा.
  • मूत्राशयाचं कार्य व्यवस्थित चालू राहण्यासाठी / लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपायम्हणजे शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवा. 
  • मूत्राशयाला त्रास देणारे कॅफीन, अल्कोहोल आणि चमचमीत मसालेदार पदार्थ खाऊ नका.
  • जेव्हा लघवीला आलीये असं वाटेल तेव्हा लगेच जा.
  • लघवी करा… थोडा वेळ थांबा आणि मूत्राशय पूर्ण रिकामं झाल्याची खातरजमा करून घ्या.

लघवी अटकावासाठी झटपट उपाय काय आहे? (What is a quick remedy for urine retention?)

सरसकट सगळ्यांना लागू करता येईल असा कोणताही उपाय नसला तरी पेलाभर पाणी पिणं आणि आरामशीर स्थितीत थांबणं ही गोष्ट कधीकधी लघवी साफ होण्यासाठी  घरगुती उपाय म्हणून किंवा लघवी व्हायला मदत करू शकते.

) लघवी अटकाव कसा बरा होऊ शकतो(How can urinary retention be cured?)

लघवी अटकावावरचे उपचार हे त्याच्या कारणावर आणि तीव्रतेवर अवलंबून असतात. आजाराची तीव्रता जास्त नसेल तर कदाचित साधे घरगुती उपाय, आहारातले आणि जीवनशैलीतले बदल या गोष्टींमुळं लघवी अटकाव बरा होऊ शकतो.

मध्यम स्वरूपाच्या किंवा गंभीर आजारात औषधोपचार, कॅथेटर बसवणं किंवा शस्त्रक्रिया करणं या गोष्टी करायला लागू शकतात. अशा वेळी योग्य निदान आणि औषधोपचार यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलून उपचार करणं केव्हाही शहाणपणाचंच…!

) लघवीचा प्रवाह वाढवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत? (What are the home remedies to increase urine flow?)

लघवीचा प्रवाह सुधारण्यासाठी पुढील घरगुती उपाय करता येतील…

  • हायड्रेटेड राहा – भरपूर पाणी प्यायल्यामुळं जास्त प्रमाणात लघवी तयार होऊन लघवीचा प्रवाह वाढतो.
  • हर्बल चहा – कर्णफुलीच्या किंवा ओव्याच्या चहासारखे हर्बल चहा लघवी प्रवाहाला उत्तेजन देतात असं मानलं जातं.
  • लिंबूवर्गीय फळं - संत्री आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळं खाल्ल्यानं लघवीचं प्रमाण वाढण्यात मदत होते.
  • लघवीचं प्रमाण वाढवणारी फळं आणि भाज्या - केळी, अननस, रताळी यांसारखी लघवीचे प्रमाण वाढवणारी फळं मूत्रपिंडांना जास्त लघवी तयार करण्यात मदत करू शकतात.

लघवी अटकावाची मुख्य कारणं कोणती आहेत / लघवी कमी होण्याची कारणे? (What are the main causes of urinary retention?)

लघवी अटकावाच्या मुख्य कारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो…

  • वाजवीपेक्षा मोठं झालेलं प्रोस्टेट - ही स्थिती लघवीच्या प्रवाहात अडथळा आणू शकते.
  • प्रोस्टेट कर्करोग - प्रोस्टेटमधल्या ट्यूमरमुळे लघवीचा मार्गात अडथळे निर्माण होऊ शकतात.
  • लघवीच्या मार्गात संसर्ग - संसर्गामुळे अस्वस्थता निर्माण होते आणि स्नायूंचं कार्य बिघडू शकतं.
  • ओटीपोटाच्या स्नायूंना इजा होणं किंवा ते कमकुवत होणं - हे स्नायू लघवीसाठी मदत करणाऱ्या अवयवांना आधार देतात.
  • मज्जातंतूंचे विकार - मेंदूच्या आणि मज्जापेशींच्या काठिण्यामुळे आणि नाशामुळे होणारे रोग(मल्टीपल स्क्लेरोसिस) किंवा पाठीच्या कण्याला झालेली दुखापत यांसारख्या परिस्थितीमुळं मूत्राशयातल्या मज्जातंतू व्यवस्थेमध्ये बिघाड होऊ शकतो.
  • औषधं - काही औषधं मूत्राशयाच्या कार्यावर दुष्परिणाम करू शकतात.

लघवी अटकाव नैसर्गिकरीत्या बरा होऊ शकतो का? (Can urinary retention be cured naturally?)

आजार बळावलेला नसेल तर किगल व्यायाम, जास्त पाणी पिणं, हर्बल पूरकं, आहारबदल आणि जीवनशैलीत बदल अशा नैसर्गिक घरगुती उपायांनी लघवी अटकाव बरा होऊ शकतो. मात्र गंभीर आजारात डॉक्टरांकडं जाऊन व्यवस्थित औषधोपचार करून घेणं गरजेचं ठरतं.

) लघवी अटकाव हा आजार खरंच बरा होऊ शकतो का? (Is urinary retention curable?)

हा आजार बरा होणं, न होणं हे त्याच्या कारणावर आणि तीव्रतेवर अवलंबून आहे. सौम्य आजारावर जीवनशैलीतले बदल आणि नैसर्गिक घरगुती उपाया / उपचार यांचा खूप चांगला परिणाम होताना दिसतो तर आजार बळावलेल्या स्थितीत योग्य औषधोपचाराची आणि वैद्यकीय मदतीची गरज भासते. 

लघवी अटकावाचा प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करावं(Which fruit is good for urinary retention?)

ठरावीक पदार्थ लघवी अटकावाच्या आजारात उपयुक्त ठरतात असं मानलं जातं. ते पुढीलप्रमाणे…

  • केळी
  • बटाटे
  • अंडी
  • धान्यं
  • काजू
  • कमी स्निग्धता असलेली प्रोटिन्स
  • शहाळ्याचं पाणी
  • नासपती