icon icon

FREE SHIPPING above Rs.350!*

Follow Us:

Author
Nobel Hygiene

In This Article

तुम्हाला देखील लघवीला गेल्यावर लघवीच्या जागी दुखणे? जाणवते का? ही एक भयंकर अनुभव असून यामुळे लघवीला जाण्याची देखील भीती वाटते. मात्र हा त्रास निमुटपणे सहन करु नका, या समस्येवर उपाय शोधून त्याचं निराकरण करा. या ब्लॉगमध्ये आपण लघवीच्या जागी दुखणे आणि त्यामागची कारणे, त्याचे घरगुती उपाय समजून घेणार आहे. 

लघवीच्या जागी आग होण्याची कारणे काय

आता प्रश्न असा उभा राहतो की, लघवीच्या जागी आग का होते? लघवीच्या जागी दुखण्याची 10 प्रमुख कारणे. 

 • मूत्रमार्गातील संक्रमण (यूटीआय)

  यूटीआय हे एक संक्रमण आहे. लघवीच्या मार्गाद्वारे बॅक्टेरियांनी प्रवेश केल्यास यूटीआयचा त्रास होतो. यामध्ये मूत्राशय, गुर्दे, मूत्रवाहिनी या मूत्रमार्गावर संक्रमण (इनेफ्शन) होते.ज्यामुळे लघवीला गेल्यावर जळजळ होते. 
 • लैंगिकसंक्रमित संसर्ग (एसटीआय)

  एसटीआय, हे लैंगिक संक्रमित संसर्ग हा एक प्रकारचा संक्रमण आहे जो लैंगिक संपर्काच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतात. क्लॅमायडिया, गोनोरिया आणि हर्पीस सारख्या एसटीआयमुळे लघवीमध्ये जळजळ निर्माण होते. 
 • योनीसंसर्ग

  महिलांमध्ये योनी संक्रमण, यीस्ट संक्रमणामुळे लघवीच्या जागी आग होऊ शकते. 
 • इंटरस्टिशियलसिस्टिटिस

  इंटरस्टिशियल सिस्टिटिस एक क्रॉनिक ब्लाडरची परिस्थिती आहे. जी मूत्राशय आणि श्रोणी क्षेत्रात (पेल्विक एरिया) मध्ये दुखणे आणि अस्वस्थता जाणवते. अशा परिस्थितीत लघवीच्या जागी जळजळ होते. 
 • प्रोस्टेटसंबंधी समस्या

  पुरुषांमध्ये लघवी दरम्यान जळजळ होणे हे प्रोस्टेट संबंधी समस्येचे संकेत आहेत. जसे की, प्रोस्टेटायटिस किंवा वाढलेला प्रोस्टेट.
 • इरिटेबलबोवेल सिंड्रोम (आयबीएस )

  हे एक प्रकारचे आतड्यांचे संक्रमण आहे. ज्यामुळे पोटदुखी आणि इतर त्रासाचे कारण बनू शकते. महत्त्वाचं म्हणजे हे मूत्राशय आणि मूत्रमार्गापर्यंत पसरते. ज्यामुळे जळजळ होऊ शकते. 
 • मूत्रपिंडातीलखडे

  मूत्रपिंडातील खड्यांमुळे लघवीमध्ये जळजळ होऊ शकते. कारण या खड्यांमुळे लघवी करताना अडथळे निर्माण होऊ शकतात. 
 • योनीमध्येकोरडेपणा

  योनीतील कोरडेपणा ही समस्या महिलांना अधिक प्रमाणात जाणवते. खासकरून रजोनिवृत्त महिलांना योनीमध्ये कोरडेपणा, लघवीच्या जागी आग होणे अशी समस्या जाणवते. 
 • काहीऔषधे

  खूप दिवसांपासून विशिष्ट औषधे घेत असल्यास यामुळे देखील लघवीच्या जागी आग जाणवते. 

लघवीच्या जागी आग होत असल्यास त्यावरील उपचार काय?

लघवीच्या जागी दुखणे रोखण्यासाठी हे उपाय तात्काळ उपचार म्हणून केले जाऊ शकतात. 

 • भरपूरपाणी प्या

  पाणी प्यायल्यामुळे लघवी पातळ राहण्यास आणि जळजळ कमी होण्यास मदत मिळते. 
 • गरजवाटल्यास लघवीला जा

  खूप वेळ लघवीला जाण्यापासून थांबवू नका. कारण यामुळे देखील जळजळ होते. 
 • औषधघ्या

  काही पेनकिलरच्या माध्यमातून जळजळ आणि त्रास कमी करण्यासाठी मदत मिळते. मात्र कोणत्याही औषधांचे सेवन करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
 • जळजळनिर्माण करण्यापासून करा बचाव

  मसालेदार पदार्थ, लिंबूवर्गीय फळे, अल्कोहोल आणि कॅफिन यासारखे पदार्थ आणि पेये टाळा ज्यामुळे मूत्राशयाला त्रास होऊ शकतो.
 • अडल्टडायपर्सचा वापर करणे

  अनेकदा लघवी करताना जळजळ झाल्यामुळे त्रास होतो. अशी लघवी बाहेर पडल्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. अशावेळी अडल्ट डायपर्सचा वापर करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. अडल्ट डायपर्स अशावेळी उत्तम पर्याय ठरु शकतात. यामुळे 16 हून अधिक तास कोरडे राहण्यास मदत होते. 
 • काहीवेळा लघवीच्या जागी आग झाल्यामुळे लघवी बाहेर पडण्याचा किंवा संसर्ग पसरण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, प्रौढ डायपर वापरणे हा एक उत्तम उपाय आहे. फ्रेंड्स ॲडल्ट डायपर हे सर्वोत्कृष्ट उत्पादनांपैकी एक आहे, जे अनेक प्रकारांमध्ये येतात आणि 16+ तास कोरडे राहण्यास सक्षम असतात.

लघवी करताना दुखणे आणि घरगुती उपाय 

लघवी दरम्यान आग होत असल्यास उपचार घेणे आवश्यक आहे. यासोबतच अनेक घरगुती उपाय देखील फायदेशीर ठरतात. सतत लघवीला होणे आणि आग होणे यावर घरगुती उपाय सहज आणि लगेच उपलब्ध केले जाऊ शकतात. 

 • बेकिंगसोडा

  बेकिंग सोडा पाण्यात मिसळून ते प्यायल्याने लघवीमध्ये आम्लतेचे प्रमाण कमी होते आणि जळजळ देखील कमी करण्यास मदत होते. 
 • प्रोबायोटिक्स

  प्रोबायोटिक्स जीवंत जिवाणू आहे जे आतड्यांच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर असतात. भारतात, प्रोबायोटिक्सचे स्त्रोत म्हणून पारंपरिक आंबलेल्या पदार्थांचा वापर केला जातो. जसे की, दही, ताक, लोणचे, इडली,डोसा इत्यादींचा समावेश आहे. प्रोबायोटिक्स मूत्र मार्गावरी बॅक्टेरियाचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतात. ज्यामुळे संक्रमण आणि जळजळ कमी होते. 
 • कॅनबेरीज्यूस

  करवंद आणि कॅनबेरी ज्यूस लघवीमधील आग कमी करण्यास उत्तम उपाय ठरु शकते. या ज्यूसच्या माध्यमातून देखी मूत्राशय आणि मूत्र मार्गावर रोखण्यास मदत करतात. ज्यामुळे यूटीआयचा धोका कमी होतो. 
 • गरमकिंवा थंड थेरेपी

  आपल्या पोटाच्या खालच्या भागात म्हणजे ओटीपोटावर गरम आणि थंड पाण्याचा शेक घेतला जाऊ शकतो. यामुळे हा त्रास कमी होतो. तसेच गरम पाण्याने आंघोळ केल्याने किंवा हिटिंग पॅडचा वापर केल्याने मदत होते. 

निष्कर्ष 

लघवीमध्ये होणारी आग ही एक अस्वस्थ आणि वेदनादक अनुभव होऊ शकतो. मात्र अनेक तात्काळ उपचार आणि घरगुती उपायांनी तुम्ही यावर मात करु शकता. जर तुम्हाला लघवी दरम्यान जळजळ होत असेल तर कारण समजून घेणे गरजेचे आहे. तसेच आवश्यक ती चिकित्सा करुन घेणे आवश्यक आहे. 

महत्त्वाचं म्हणजे, लघवी दरम्यान होणारी आग या त्रासावरती उपाय शक्य आहे. भरपूर पाणी पिणे, जळजळ निर्माण करणाऱ्या पदार्थांपासून लांब राहा आणि त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपायाचा वापर करा. सोबतच लघवीची गळती, लघवीतील असंयम आणि संक्रमण टाळण्यासाठी फ्रेंड्स ॲडल्ट डायपरचा वापर करा. 

FAQs 

लघवीच्या जागी आग का होते?

लघवीच्या जागी होणारी आग वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते. ज्यामध्ये यूटीआ,एसटीआय, योनी संक्रमण, इंटरस्टिशियल सिस्टिटस, प्रोस्टेट समस्या, आयबीएस, मूत्रपिंडातील खडे, एन्यूरिसिस, योनीमार्ग कोरडा होणे आणि औषधांचा वापर याचा समावेश आहे. 

लघवीच्या जागी आग होत असल्यास कोणत्या प्रकारचा आघार घ्यावा?

एक निरोगी आहार ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फळे, भाज्या, धान्ये आणि प्रोटीनचा समावेश आहे. यूटीआय आणि इतर संक्रमणांचा त्रास कमी करण्यासाठी मदत करु शकतात. 

लघवी दरम्यान आग होत असेल तर डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा?

जेव्हा लघवीमध्ये जळजळ आणि त्यासोबत रक्त पडणे, पोट दुखी, ताप येणे असा त्रास देखील होतो. या महिलामध्ये असामान्य योनी स्त्रावाची लक्षणे दिसतात. या दरम्यान लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

लघवीमध्ये आग होत असल्यास ती गंभीर स्थिती समजावी का

हो, लघवी दरम्यान जळजळ होत असेल तर ती गंभीर अंतर्निहित स्थिती असल्याचे संकेत असू शकते. जसे की, यूटीआय, एसटीआय किंवा मुत्रपिंडातील खडे यांचा समावेश आहे. यावर जर उपचार केले नाही तर आरोग्याशी संबंधीत समस्या अधिक गुंतागुंतीच्या होऊ शकतात. 

लघवीच्या जागी आग आणि युरिन इन्फेक्शनमध्ये काही संबंध आहे का

लघवी दरम्यान होणारी आग यूटीआय सारख्या मूत्र संक्रमणाचे लक्षण असू शकते. बॅक्टेरिया मूत्र मार्गावर प्रवेश करतात तेव्हा सूज येते आणि जळजळ होते.

To get updated on the latest stories across categories choose