skip to content
icon icon

FREE SHIPPING above Rs.350!*

Follow Us:

Author
Nobel Hygiene

In This Article

किती वेळा लघवीला जावे लागते - याविषयीची संक्षिप्त माहिती / थोडक्यात माहिती

सामान्यतः प्रत्येक माणसामध्ये लघवीला जाण्याची गरज ही वेगवेगळी असते. बरेच जणांना 24  तासांमध्ये 4 ते 10 वेळा लघवीला जाण्याची गरज असते. वारंवार लघवीला जाण्याच्या गरजेबद्दल  बोलताना सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसातून किती वेळा लघवीला जावे लागते आणि किती वेळा तातडीने जावे लागते हे आहे. ज्यांचे लघवीला जाण्याचे प्रमाण सामान्य आहे अशा व्यक्तीला लघवीला जाण्यापूर्वी पुरेसा वेळ मिळतो आणि त्यांना टॉयलेट/ शौचालया पर्यंत पोचण्याआधी किमान काही मिनिटे वाट पाहणे कठीण जात नाही. तसेच जर एखादी व्यक्ती रोज 2 ते 4 लिटर पाणी पित असेल, तर त्यांना टॉयलेटला /शौचालयाला जाण्यासाठी किमान 2 तासांचा वेळ/अवधी असायला पाहिजे.

जर यापैकी एकाचे प्रमाण बदलले तर तुम्ही (युरिनरी इंकाँटिनन्स) urinary incontinence म्हणजेच लघवी होण्यावरील संयम ढासळणे किंवा अतिक्रियाशील ब्लॅडर सिन्ड्रोम चा सामना करू शकता. याची विविध कारणे असू शकतात, जसे की ब्लॅडर  /मूत्राशय पूर्णपणे संकुचित न होणे, ब्लॅडर/मूत्राशय पूर्णपणे रिकामे  न होणे, नसांचे नुकसान आणि डायबिटीस /मधुमेह असणे.

सर्वसाधारणपणे लघवीला वारंवार जाण्याचे प्रमाण हे अतिक्रियाशील ब्लॅडर सिन्ड्रोममुळे असू शकते. हे त्यावेळी घडते जेव्हा ब्लॅडर /मूत्राशय पूर्ण न भरताच (जसे की तो अर्धा किंवा चौथा भाग पूर्ण भरला असताना) ते संकुचित होते (लघवीला जाण्यास कारणीभूत होतो). यामुळे खरोखरच फारशा प्रमाणात लघवी निर्माण झालेली नसतानाही टॉयलेटला /शौचालयाला जाण्याची वाढती गरज निर्माण होते.

सामान्यपणे दिवसातून किती वेळा लघवीला जावे लागते याचे प्रमाण दिवसात किती प्रमाणात द्रवपदार्थ सेवन केले जातात यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, हाय ब्लड प्रेशर /उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी देण्यात येणारी लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे लघवी होण्यामध्ये वाढ करू शकतात. सप्लिमेंट्स /पूरक आहार, स्टेरॉइड्स आणि औषधे देखील वारंवार लघवीला जाण्याचे प्रमाण वाढवू  शकतात.

वारंवार लघवी येण्याची 7 कारणे खालील प्रमाणे आहेत:

सतत होणाऱ्या लघवीचे प्रमाण लक्षात घेता किडनीच्या समस्यांपासून ते साध्या हायड्रेशनच्या सवयींपर्यंत विविध आरोग्यविषयक चिंतेचे संकेत मिळू शकतात. जर तुम्हाला वारंवार लघवी होणे आणि त्यासोबत अंगात ताप असणे, तसेच लघवी करण्याची तीव्र इच्छा होणे आणि तुमच्या ओटीपोटात अस्वस्थता दिसली, तर ते युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन /लघवीच्या मार्गात होणारे संक्रमण असल्याचे सूचित करू शकते. वयात होणारे बदल, हार्मोनल चढउतार आणि न्यूरोलॉजिकल परिस्थिती देखील वारंवार लघवी होण्याचे आणि सतत लघवीची निकड होणे ह्यास कारणीभूत होऊ शकते. वारंवार लघवी येण्याच्या इतर कारणांमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत :

  • डायबिटीस /मधुमेह:

    टाईप 1 आणि टाइप 2 या दोन्ही डायबिटीसच्या  /मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वारंवार लघवी होणे हे घडू शकते  कारण शरीर लघवीद्वारे अतिरिक्त ग्लुकोज बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते.
  • प्रेग्नंन्सी /गर्भधारणा:

    जसजसे गर्भाशयाचा विस्तार होतो, तसतसे ते  मूत्राशयावर दबाव आणण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे विशेषत: गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात अधिक प्रमाणात वारंवार लघवी होऊ शकते.
  • प्रोस्टेट समस्या:

    वाढलेली प्रोस्टेट लघवीच्या प्रवाहात अडथळा आणू शकते, मूत्राशयावर दबाव देऊ शकते आणि वारंवार लघवी करण्यास प्रवृत्त करू शकते.
  • इंटरस्टिशियल सिस्टिटिस:

    या अवस्थेत मूत्राशय आणि ओटीपोटात दुखते , त्यामुळे अनेकदा तातडीच्या किंवा वारंवार होणाऱ्या लघवीचे प्रमाण वाढते.
  • लघवीचे प्रमाण वाढवणाऱ्या पदार्थांचा वापर:

    हाय ब्लड प्रेशर /उच्च रक्तदाब या सारख्या परिस्थितीसाठी लिहून दिलेली औषधे वारंवार लघवी येण्यास प्रवृत्त करू शकतात.
  • न्यूरोलॉजिकल समस्या:

    स्ट्रोक किंवा न्यूरोलॉजिकल रोगांसारख्या परिस्थितीमुळे मूत्राशयाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे अचानक लघवी येण्याची इच्छा होते.
  • हायपरकॅल्सेमिया:

    रक्तातील कॅल्शियमची पातळी वाढणे, ओव्हरएक्टिव्ह पॅराथायरॉइड ग्रंथी किंवा काही आजार यासारख्या विविध कारणांमुळे वारंवार लघवी होणे आणि जास्त तहान लागणे, पोट बिघडणे आणि हाडे/स्नायू दुखणे अशा गोष्टी होऊ शकतात.

जर तुम्हाला ताप किंवा इतर कोणत्याही लक्षणांसह वारंवार लघवी येणे हे जाणवत असल्यास, योग्य मूल्यमापन आणि मार्गदर्शनासाठी हेल्थकेअर प्रोफेशनल्स /आरोग्यसेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत करणे गरजेचे आहे. वारंवार येणाऱ्या लघवीची कारणे समजून घेणे आवश्यक आहे त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

आरोग्याच्या दृष्टीने योग्य अशा प्रमाणात लघवी येणे / हेल्दी युरिनरी फ्रिक्वेंसी

एखाद्याने दिवसातून किती वेळा लघवीला जावे याचे प्रमाण माहित असणे आवश्यक आहे, त्यामध्ये काही विसंगती आढळल्यास योग्य ती तपासणी /चेक अप करून घ्यावे.  सामान्यतः, लोक दिवसातून सुमारे सहा ते सात वेळा लघवी करतात, सामान्यपणे यातही फरक असू शकतो. अनेक घटक सतत होणाऱ्या लघवीच्या प्रमाणावर प्रभाव टाकतात, ज्यात वय, दैनंदिन द्रवपदार्थाचे सेवन, पेये निवडणे, आरोग्य स्थिती जसे की मधुमेह/डायबिटीस किंवा मूत्रमार्गात संक्रमण/युरिनरी ट्रॅक इंफेक्शन(diabetes or urinary tract infections (UTIs) (यूटीआय)), औषधांचा वापर आणि मूत्राशयाची क्षमता यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, प्रेग्नेंसीमध्ये /गर्भधारणेमध्ये लघवी येण्याचे प्रमाण हे  सामान्य प्रमाणापेक्षा जास्त असते.

जर तुम्ही काही दिवस कमी-जास्त प्रमाणात लघवी करत असाल, तर ती काळजीची बाब नाही. दररोज नियमितपणे सातपेक्षा जास्त वेळा लघवी करणे काही व्यक्तींसाठी सामान्य असू शकते आणि ते आरोग्याच्या समस्यांचे संकेत देत नाही. तथापि, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंग  (the National Institute of Aging) तुम्हाला हा सल्ला देते की तुम्ही नियमितपणे आठ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा लघवी करत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जेव्हा सतत लघवी येणे हे अस्वाभाविक मानले जाते

तुम्ही शेवटच्या वेळी कधी बसून तुमच्या लघवीबद्दल विचार केला होता? उत्तर आज सकाळी किंवा काल असे काहीतरी असेल तर; जर तुम्ही नेहमी टॉयलेटच्या /शौचालयाच्या शोधात असाल तर लघवी करण्याचा विचार करत असाल, जर तुम्ही मॉल्स आणि पार्ट्यांबद्दल घाबरत असाल कारण "टॉयलेटमधली /शौचालयातील लाईन खूप मोठी असेल तर काय होईल ?" किंवा तुम्ही इथे आहात, हा ब्लॉग वाचत आहात, कारण तुम्ही 'नैसर्गिकपणे सतत ' सारखे काहीतरी Google केले आहे, शक्यता आहे की तुम्हाला असंयम/ इंकन्टिनन्स  किंवा ओव्हरएक्टिव्ह ब्लॅडर सिंड्रोमचा त्रास होत आहे.

केलेल्या संशोधनानुसार असे लक्षात येते की, एखाद्या कुटुंबाशी बोलण्याआधी किंवा डॉक्टरांशी सल्लामसलत करण्यापूर्वी बहुतेक लोकांना जवळपास 1.5 वर्ष वारंवार लघवी( frequent urination) येणे या प्रकारचा  त्रास झालेला असतो. वारंवार लघवी होण्याच्या लक्षणांसोबत येणारी लाजीरवाणी आणि भीती आपल्याला समजत असली तरी त्यावर उपचार न केल्याने ही परिस्थिती आणखीनच बिघडू शकते.

अशाप्रकारे, जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या बाबतीत सतत लघवी येणे ही गोष्ट सामान्य नाही , किंवा ज्यामुळे तुमचे काम/जीवन/झोप यामध्ये गडबड होत आहे त्यामुळे टॉयलेटला /शौचालयाला सतत भेट दिली जात आहे, तर डॉक्टरांना भेटणे हे  योग्य ठरेल.

तुम्ही अनुभवत असलेल्या वारंवार लघवी येणे  आणि त्याची निकड भासणे याविषयी डॉक्टरांना तुमच्याकडून काही तपशीलांची आवश्यकता असेल. अशा प्रकारे त्यांना भेट देण्यापूर्वी खालील गोष्टी रेकॉर्ड करणे/ त्यांची नोंद करणे ही  चांगली कल्पना आहे:

  • दिवसातून किती वेळा तुम्ही टॉयलेटला जाता?/ शौचालयाला भेट देता ?
  • प्रत्येक वेळी जात असताना त्यामधल्या काळाचा अवधी किती असतो ?
  • प्रत्येक वेळी होणाऱ्या लघवीचे प्रमाण किती असते ?
  • तुमची लघवी असंयमित होते का ?/ लघवी गळती होते का ?
  • तुम्हाला किती वेळा लघवी करण्याची तीव्र, अनियंत्रित इच्छा वाटते?
  • जास्त प्रमाणात लघवी येण्याची तीव्र जाणीव होते का ?
  • तुम्ही डायबिटीस  वगैरेसाठी काही औषधे घेत आहात का?
  • तुमचा आहार कसा आहे?
  • तुम्ही साधारणपणे किती प्रमाणात पाणी पिता किंवा इतर द्रव पदार्थांचे सेवन करता ?
  • रात्रीच्या झोपेमधून तुम्हाला लघवी करण्यासाठी किती वेळा उठावे लागते?
  • तुम्हाला रात्रीच्या वेळी लघवीचा त्रास जाणवतो  का?

डॉक्टरांना  भेटण्याआधी  3-5 दिवस यासारख्या टिप्सची नोंद ठेवल्यास डॉक्टर तुम्हाला जलद, अधिक अचूक निदान करण्यास मदत करतील.

तुम्हाला कोणत्या लक्षणांची जाणीव असायला हवी?

सामान्यतः लघवी येणे हे तणावमुक्त लघवीद्वारे दिसून येते. जर तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लघवीची  समस्या जाणवत असेल तर तुम्हाला वारंवार लघवीला सामोरे जावे लागत असेल:

  • दर 30 मिनिटांनी लघवी करण्याची तीव्र इच्छा होते
  • दर अर्ध्या तासाने लघवी करण्याची तीव्र गरज भासणे
  • तीव्रतेने लघवी येणे पण प्रत्यक्षात मात्र लघवीचे प्रमाण खूप कमी असणे
  • लघवी करण्याची तीव्र इच्छा, पण लघवी फार कमी किंवा क्षुल्लक प्रमाणात होणे
  • ब्लॅडर /मुत्राशयावरील नियंत्रण गमावल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी अंथरुण ओले होणे.
  • लघवी करताना, तुम्हाला वेदना किंवा जळजळ होण्याचा अनुभव येऊ शकतो
  • एक विलक्षण रंगाची लघवी
  • लघवी होताना त्रास होणे
  • दिवसभर थेंब-थेंब  लघवी होत राहणे 

पुरुषांमध्ये होणारे लघवीचे प्रमाण / युरिनरी फ्रिक्वेंसी

प्रोस्टेट वाढणे, मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय), किंवा मूत्राशय/ब्लॅडर समस्या यासारख्या विविध कारणांमुळे पुरुषांना सतत लघवी येऊ शकते. प्रोस्टेट वाढणे, अनेकदा जे वाढलेल्या वयाशी संबंधित असते, ज्यामुळे लघवीच्या प्रवाहात अडथळा येऊ शकतो आणि जे वारंवार लघवी करण्यास प्रवृत्त करू शकते. UTIs, जरी पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत कमी प्रमाणात आढळतात, तरीही जेव्हा बॅक्टेरिया मूत्रमार्गात संक्रमित होतात तेव्हा पुरुषांमध्ये सतत होणाऱ्या लघवीचे प्रमाण वाढू शकते. याव्यतिरिक्त, मूत्राशयाच्या समस्या जसे की अतिक्रियाशील मूत्राशय किंवा मूत्राशयाची जळजळ पुरुषांमध्ये सतत होणारी लघवी वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, योग्य निदान आणि व्यवस्थापनासाठी वैद्यकीय मूल्यमापन आवश्यक आहे.

स्त्रियांमध्ये होणारे लघवीचे प्रमाण / युरिनरी फ्रिक्वेंसी

हार्मोनल बदल, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) आणि पेल्विक आरोग्य समस्या यांसारख्या घटकांमुळे महिलांना वारंवार होणाऱ्या लघवीच्या प्रवृत्तीवर याचा सतत परिणाम होतो. मासिक पाळी, गर्भधारणा/प्रेग्नंन्सी  किंवा मेनॉपाझ /रजोनिवृत्ती दरम्यान होणाऱ्या हार्मोनल चढउतारांमुळे  मूत्राशयाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो आणि  जे सतत होणाऱ्या लघवीचे प्रमाण वाढवू शकतात. यूटीआय, जे त्यांच्या लहान मूत्रमार्गामुळे स्त्रियांमध्ये अधिक प्रचलित आहेत, ज्यामुळे लघवी करताना जळजळ होणे यासारख्या इतर लक्षणांसह वारंवार लघवी होऊ शकते. पेल्विक फ्लोअर डिसफंक्शन किंवा इंटरस्टिशियल सिस्टिटिस यासारख्या ओटीपोटाच्या आरोग्याच्या अवस्था देखील स्त्रियांमध्ये सतत होणाऱ्या लघवीबद्दल  कारणीभूत ठरू शकतात, ज्यासाठी अचूक निदान आणि उपचारांसाठी वैद्यकीय मदत घेण्याच्या महत्त्वावर ते जोर देते. गर्भधारणेदरम्यान/प्रेग्नंन्सी दरम्यान वारंवार होणारी लघवी ही हार्मोनल बदलांमुळे आणि मूत्राशयावर वाढणारे गर्भाशय दाबल्यामुळे तीव्र होते. महिलांना त्रास देणारी ही वारंवार होणारी लघवीची अवस्था ही अनेक गरोदर स्त्रियांना अनुभवलेली एक विशिष्ट अस्वस्थता आहे.

रात्रीच्या वेळी वारंवार होणाऱ्या लघवीबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे

रात्रीच्या वेळी सतत होणाऱ्या लघवीचे प्रमाण, जे बहुतेकदा वाढलेल्या वयामुळे कारणीभूत असते, त्यात अँटीड्युरेटिक हार्मोनचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे लघवीचे उत्पादन वाढते, विशेषत: रात्री, आणि ज्यामुळे मूत्राशयाचे/ब्लॅडरचे  स्नायू कमकुवत होतात. यातील इतर कारणे, जसे की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन /मूत्रमार्गात होणारे संक्रमण, झोपण्याआधी जास्त प्रमाणात द्रवपदार्थ घेणे आणि काही औषधे देखील यात योगदान देऊ शकतात. या लक्षणांमध्ये रात्री वारंवार लघवी होणे, लघवी करण्याची निकड भासणे आणि झोपेच्या गुणवत्तेत संभाव्य व्यत्यय निर्माण होणे , विशेषत: म्हाताऱ्या माणसांमध्ये पडण्याचा आणि इजा होण्याचा धोका यांचा समावेश होतो.

कोणते घटक सतत होणाऱ्या लघवीवर / युरिनरी फ्रिक्वेंसीवर परिणाम करतात?

वारंवार लघवी येणे /  युरिनरी फ्रिक्वेंसी खालील बाबींमुळे प्रभावित होते :

  • हायड्रेशनची  पातळी
  • ब्लॅडर /मूत्राशयाचे आरोग्य
  • डायबिटीस /मधुमेह किंवा यूटीआय सारख्या वैद्यकीय परिस्थिती
  • औषधांचा वापर
  • आपल्या जीवनशैलीच्या सवयी जसे की कॅफीन आणि अल्कोहोल यांचे सेवन
  • वयानुसार होणारे बदल
  • हार्मोनल चढउतार, आणि
  • न्यूरोलॉजिकल स्थिती

हे घटक समजून घेतल्याने ट्रिगर ओळखण्यात आणि प्रभावी उपचार मिळविण्यात मदत होते.

वारंवार येणाऱ्या लघवीचे  व्यवस्थापन  करण्यासाठी  काही टिप्स खालीलप्रमाणे :

सतत होणाऱ्या लघवीचे नियंत्रण करण्यासाठी, खालील गोष्टी केल्या जाऊ शकतात:

  • हेल्दी ब्लॅडर हॅबिट्स /मूत्राशयाच्या निरोगी सवयींचा अवलंब करा, जसे की ठरवून लघवी (प्रत्येक 3-4 तासांनी एकदा लघवी करणे).
  • केगेल्स सारखे पेल्विक फ्लोर व्यायाम स्नायूंना बळकट करतात आणि मूत्राशयावरील  नियंत्रण सुधारतात.
  • आपण किती प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करता याचे निरीक्षण करा, विशेषत: झोपेच्या आधी, आणि वैयक्तिक उपचार पद्धतींसाठी वैद्यकीय मूल्यमापन करा, ज्यामध्ये शस्त्रक्रिया, औषधे तसेच वर्तणुकीशी संबंधित उपचारांचा समावेश असू शकतो.
  • उत्तम जीवन जगण्यासाठी आणि वारंवार येणाऱ्या लघवीच्या व्यवस्थापनासाठी  हेल्थकेअर प्रोफेशनल्स / आरोग्याविषयी सल्ला देणाऱ्या व्यावसायिकांना सपंर्क करा.
  • हे सर्व वारंवार येणाऱ्या लघवीच्या आव्हानांचे व्यवस्थापन करण्याबद्दलआहे

येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वारंवार लघवी होणे हे एखाद्या आजाराचे लक्षण असते आणि ते नुसतेच दिसून येत नाही तर  हा रोग किडनी /मूत्रपिंड, युरेटर्स /मूत्रनलिका, युरेथ्रा /मूत्रमार्ग, ब्लॅडर /मूत्राशय किंवा नर्व्स /मूत्र प्रणाली यांना नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतू आणि स्नायूंवर देखील परिणाम करू शकतो.

सामान्यप्रकारात होणाऱ्या लघवीसाठी परिणाम करणाऱ्या यापैकी काही परिस्थितींमध्ये हे समाविष्ट आहे:

  1. किडनी फंक्शन मध्ये बदल किंवा किडनी स्टोन
  2. प्रोलॅप्स सिस्टोसेल किंवा पेल्विक स्नायूंना होणारे इतर नुकसान
  3. प्रेग्नंन्सी /गर्भधारणा किंवा प्रेग्नंन्सी नंतरची /गर्भधारणेनंतरची होणारी गुंतागुंत
  4. मेनोपॉज / रजोनिवृत्ती
  5. डायबिटीस / मधुमेह
  6. डाक्युरिटीक / लघवीच्या प्रमाणात वाढ करणारे
  7. जास्त अल्कोहोल, कॅफीन किंवा द्रवपदार्थ
  8. युरेथ्रा / मूत्रमार्गाचे आकुंचन होणे/ अरुंद होणे
  9. प्रोस्टेट समस्या
  10. शरीराच्या खालच्या भागात दिलेले रेडिएशन उपचार
  11. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन / मूत्रमार्गात होणारे संक्रमण

या काळात फ्रेंड्स डायपर कशी मदत करू शकतात

मुंबईल्या  गजबजलेल्या  भागात आकाश जैन यांचा कपडे विकण्याचा चांगला व्यवसाय होता. ते दिवसाला बारा तासांपेक्षा जास्त वेळ दुकानात बसत. कर्मचाऱ्यांची देखभाल आणि ग्राहकांशी थेट संवाद साधणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. "साडी तर अशीच विकली जाते," असे ते म्हणायचे. पण 2019 मध्ये अचानक जैन यांनी दुकान बंद केले, कर्मचारी काढून टाकले आणि ते घरी आले. ते म्हणाले की आता त्यांना रिटायर /निवृत्ती होण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांचा बँकेत नोकरी करणारा मुलगा घेऊ लागला. पैशाची खूप चणचण भासू लागली. कुटुंबात वाद वाढले आणि अस्वस्थता वाढली. या सगळ्यामागे कारण काय होते ? वारंवार लघवीला जावे लागणे / फ्रिक्वेन्ट युरीनेशन !

जेव्हा जैन यांना सामान्यपणे लघवी येण्याची जाणीव व्हायची  तेव्हा त्यांना बाजारात असलेल्या सार्वजनिक शौचालयापर्यंत/टॉयलेटपर्यंत  पोचायला पाच मिनिटांची चाल होती. पण प्रोस्टेटची शस्त्रक्रिया झाल्यानंतर शौचालयापर्यंत/ टॉयलेटपर्यंत  पोहोचणं त्यांच्यासाठी कठीण होऊ लागलं. ते वाटेत धावत जायचे,त्यांना धाप लागायची , डोळ्यात पाणी येऊ लागायचे आणि त्यांना वाटायचे की त्यांचे ब्लॅडर आता फुटेल आणि लघवीवर कंट्रोल राहणार नाही /त्यांच्या मूत्रनलिकेतला वेग कंट्रोलबाहेर जाईल. बहुतेक दिवशी ते शौचालयापर्यंत /टॉयलेटपर्यंत पोहोचायचे, पण एक दिवस असा आला की त्यांना ते शक्य झाले नाही.

या गर्दीच्या बाजारात बरेच वर्ष दुकान चालवणारा, एक प्रतिष्ठित  माणूस कलिंगडे  आणि अगरबत्ती विकणाऱ्यांच्या मधोमध उभा होता. लघवीवरचे नियंत्रण गेल्यामुळे त्यांचा पायजामा ओला झाला होता. त्यांनी असे काही केले होते, ज्या गोष्टीचा विचार कोणी मनात सुद्धा आणू शकत नाही.

आता काही करायचे शिल्लक नव्हते, फक्त दुकान बंद करून  निघून जायचे होते. कायमचे !

आमच्या डायपरसाठी संशोधन अभ्यास करताना आम्ही जैन यांना भेटलो. एका लहानशा प्रयत्नांमुळे श्री.  जैन यांनी त्यांचे दुकान पुन्हा उघडले. “फ्रेंड्स डायपरने (“Friends diapers) माझे आयुष्य बदलून टाकले. त्यांनी मला परत आत्मविश्वास दिला आणि माझी भीती काढून टाकली. मी त्यांचा खूप आभारी आहे,” त्याने आमचे  डायपर वापरायला सुरुवात केल्यानंतर एक महिन्यानंतर आम्हाला सांगितले.

त्यांच्यासाठी असे काय महत्वाचे घडले ?

  1. डिझाईन आणि फिट:

    फ्रेंड्स ड्राय पँट्स( Friends Dry Pants) पुल-अप अंडरवेअर प्रमाणे डिझाइन केले आहेत जे सहजपणे परिधान करता येतात. यात वापरण्यात आलेले मटेरियल पातळ आणि मऊ आहे आणि जे कपड्यांखाली दिसण्यात येत नाही.
  2. नियंत्रणासाठी मदत:

    ड्राय पँट हे अनेक प्रकारे सुरक्षित राहण्याचे एक साधन आहे. आता, जैन यांना हे माहीत आहे की ते जरी शौचालयात/ टॉयलेटपर्यंत पोहोचले नाही तरी त्यांची पँट ओली होणार नाही आणि सार्वजनिकरित्या लाजिरवाणे वाटेल अशी घटना होणार नाही.
  3. ओडर लॉक:

    फ्रेंड्स ड्राय पँट ओडर लॉक तंत्रज्ञानासह येतात हे सुनिश्चित करण्यासाठी की परिधान करणाऱ्याला ताजेतवाने वाटते आणि कोणत्याही प्रकारचा घाण वास /दुर्गंधी येत नाही .
  1. हाय ऍबसॉरप्शन /उत्तम प्रकाराने शोषले जाणे :

    जैन सारखे वापरकर्ते कामाच्या दिवसात, गळतीची चिंता न करता, विविध युरीन सायकल्स द्वारे /मूत्र चक्रांद्वारे 8 तासांपर्यंत कोरडी पँट घालू शकतात. फ्रेंड्स डायपर झटपट रितीने लघवीला जेलच्या रूपात रूपांतरित करतात आणि जलद कोरडे, अत्यंत शोषक अनुभवासाठी मार्ग तयार करतात.
  1. वारंवार लघवी होणे, खरंच, याला सामोरे जाणे आव्हानात्मक असू शकते. तथापि, जर योग्यरित्या आणि योग्य संसाधनांसह व्यवस्थापित केले तर जगणे सोपे होऊ शकते. :)

FAQ / वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुम्ही दिवसातून किती वेळा लघवी करावी?

तुम्ही साधारणपणे दिवसातून 6 ते 7 वेळा लघवी केली पाहिजे. तथापि, हे तुम्ही किती पाणी पिता, तुमचे वय, तुमच्या आरोग्याची स्थिती आणि तुमच्या ब्लॅडरची कपॅसिटी /मूत्राशयाची क्षमता यासह अनेक घटकांवर अवलंबून बदलू शकते. तसेच, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की महिलांच्या बाबतीत येणाऱ्या लघवीचे प्रमाण हे पुरुषांच्या लघवीच्या प्रमाणात वेगळे असते,विशेषत: प्रेग्नंन्सीदरम्यान /गर्भधारणेदरम्यान लघवी होण्याचे प्रमाण वेगळे  असते.

एकदा लघवी केल्यानंतरही मला पुन्हा लघवी करावीशी वाटते, असे वाटण्याचे कारण काय ?

अपूर्ण रिकाम्यापणाच्या संवेदना किंवा लघवी केल्यानंतरही लघवी करण्याची सतत इच्छा होण्याचे कारण अतिक्रियाशील मूत्राशय, मूत्रमार्गात संक्रमण किंवा मूत्राशयाची जळजळ यांसारख्या परिस्थिती  कारणीभूत ठरू शकतात . योग्य निदान आणि व्यवस्थापनासाठी हेल्थकेअर प्रोफेशनलचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

तुम्ही किती काळ लघवी रोखून ठेवू शकता?

मूत्राशयाची क्षमता बदलत असताना, अस्वस्थता आणि संभाव्य मूत्राशय संबंधित समस्या टाळण्यासाठी मूत्राशय दर 3 ते 4 तासांनी रिकामे करण्याची शिफारस केली जाते. जास्त लघवी राखून ठेवल्याने मूत्रमार्गात संक्रमण आणि मूत्राशयाच्या गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो.

निरोगी युरीनचा /लघवीचा रंग कोणता असतो?

नियमितपणे पाणी प्यायल्यावर आणि शरीरातून कचरा निघाल्यावर लघवीचा रंग पांढरट किंवा हलका पिवळसर दिसतो. गडद रंगाची लघवी झाल्यास  शरीरात पाणी कमी झालंय असं समजावं. जर लघवीचा रंग ढगाळ किंवा वेगळ्या रंगाचा दिसला तर शरीरात काहीतरी समस्या असू शकते, त्यामुळे डॉक्टरांना दाखवायला हवं.

To get updated on the latest stories across categories choose