मूत्रमार्गात असंयम होणे किंवा अचानक लघवी गळती होणे, ही वृद्ध व्यक्तीची स्थिती समजली जाते. पण प्रत्यक्षात मात्र, 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 5 पैकी 1 पुरुष आणि 3 पैकी 1 महिला यांवर याचा परिणाम होतो.
अपघाती मूत्र गळती म्हणजे काय?
एखादी व्यक्ती अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे लघवी बाहेर पडण्यापासून नियंत्रित करू शकत नाही तेव्हा त्या गोष्टीला अपघाती लघवी गळती किंवा लघवीचा असंयम असे म्हटले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती हसत असताना, शिंकताना किंवा ती व्यक्ती वेळेवर शौचालयात पोहोचू शकत नसल्यामुळे किंवा मधुमेह झाला असल्याची वैद्यकीय परिस्थिती असते तेव्हा असे होऊ शकते.
आकस्मिक रित्या होणारी लघवी गळती ही एक स्वतंत्र स्थिती नाही तर अंतर्निहित समस्येचे एक लक्षण आहे आणि एकदा या समस्येवर उपचार केल्यावर, कदाचित तुम्हाला लघवी गळतीचा अनुभव येणे देखील थांबेल.
आकस्मिक मूत्र गळतीचे मुख्य प्रकार कोणते आहेत?
आकस्मिक मूत्र गळती वेगवेगळ्या स्वरूपात येते, यासह:
●ताणतणाव असंयम –
- अशा प्रकारचा आकस्मिक लघवी गळती होण्याचा अनुभव एखाद्या व्यक्तीला येतो जेव्हा ती व्यक्ती शिंकते, हसते, काहीतरी जड उचलते किंवा मूत्राशयावर दबाव आणणारी क्रिया करते.
- मूत्राशय उघडणे आणि बंद होणे या क्रियेवर नियंत्रण ठेवणारे स्नायू कमकुवत झाल्यामुळे हे उद्भवते.
- परिणामी लहान स्वरूपात गळती होते- थोड्या प्रमाणात शिंतोडे उडाल्यासारखी गळती होते.
- बाळंतपणानंतर, गर्भधारणा झाल्यावर किंवा रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये हे मुख्यतः दिसून येते.
●अतिप्रवाह असंयम –
- याचे उदाहरण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती त्यांचे मूत्राशय पूर्णपणे रिकामे करू शकत नाही.
- मूत्राशयातील कमकुवत स्नायू किंवा मूत्राशयातील अडथळ्यामुळे या मुळे हे उद्भवते.
- याचा परिणाम नंतर थोड्या प्रमाणात लघवी होण्यात होतो.
- मूत्राशयातील अडथळे आणि प्रोस्टेट समस्या असलेल्या पुरुषांमध्ये मुख्यतः हे दिसून येते
- मूत्राशय खूप भरलेले असल्याकारणाने आणि मूत्राशय पूर्णपणे रिकामे करण्याच्या असमर्थतेमुळे उरलेले मूत्र थोड्या प्रमाणात नंतर बाहेर पडते. सामान्यतः ज्या पुरुषांना मधुमेह किंवा प्रोस्टेट समस्या आहेत त्यांच्यात हे दिसून येते.
●असंयम होण्याची तीव्रता –
लघवीची अचानक, तीव्र आणि अनियंत्रित गरज निर्माण होणे.बऱ्याचदा वृद्ध लोकांमध्ये हे दिसून येते.
लघवी गळतीचे व्यवस्थापन करण्याचे कोणते मार्ग आहेत?
लघवी गळती व्यवस्थापित करणे रॉकेट विज्ञानापेक्षा खूप सोपे आहे, याची आम्ही खात्री देतो! तुम्ही प्रयत्न करू शकता अशा काही गोष्टी येथे आहेत:
●ओटीपोटाच्या स्नायूंचे व्यायाम –
घरी करण्यासाठी सोपा असा व्यायाम ज्यामध्ये ओटीपोटाच्या खालच्या स्नायूंना आवळून धरणे आणि सोडणे हे केले जाते, शरीरातील या स्नायूंचा वापर लघवीचा प्रवाह थांबविण्यासाठी होतो.
●मूत्राशय विषयी प्रशिक्षण –
जोपर्यंत शक्य असेल तितका काळ तुमचे मूत्राशय धरून ठेवा. तुम्ही तुमच्या मूत्राशयाला धरून ठेवण्यासाठी प्रशिक्षित करत असताना त्याची वेळ वाढवत रहा.
●वयस्कर लोकांसाठी वापरण्याचे डायपर –
म्हणजे तुमची समस्या नियंत्रणात येईपर्यंत लघवीची गळती व्यवस्थापित करण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय. फ्रेंड्स नी बनवलेले मोठ्या माणसांसाठीचे डायपर सहजपणे द्रव शोषून घेणारे असतात आणि अंडरवेअर प्रमाणे घट्ट बसतात तसेच दुर्गंधालाही दूर ठेवतात.
मूत्र गळती व्यवस्थापित करण्यासाठी मला शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे का?
मूत्रसंस्था व्यवस्थापित करण्यासाठी वर सूचीबद्ध केलेल्या उपचार पद्धती तुमच्यासाठी काम करत नसतील, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी शस्त्रक्रिया मार्गांच्या जोखमी आणि फायद्यांविषयी चर्चा करू शकता. लक्षात ठेवा, लघवीची गळती थांबवण्यापेक्षा जास्त वेळा मूत्र गळतीस कारणीभूत असणा-या मूळ स्थितीवर उपचार करणे आवश्यक आहे,त्यासाठी विलगीकरण हा एक पर्याय आहे.
काही सामान्य शस्त्रक्रिया खालीलप्रमाणे आहेत:
●प्रोस्टेट शस्त्रक्रिया हा एक पर्याय आहे जो प्रोस्टेट वाढीचा त्रास असलेल्या पुरुषांना वापरता येतो. या स्थितीत प्रोस्टेट ग्रंथी, (जी पुरुषांमध्ये आढळणारी एक लहान, अक्रोड-आकाराची ग्रंथी आहे) त्याच्या सामान्य आकारापेक्षा जास्त विस्तारते आणि मूत्रमार्गावर दाब आणते (शरीरातून मूत्र बाहेर टाकणारी नळी)ज्यामुळे गळती होते. या शस्त्रक्रियेमध्ये प्रोस्टेट ग्रंथी (बहुधा लेप्रोस्कोपिक रीतीने ) कमी करणे/काढणे समाविष्ट असते.
●तणावाच्या असंयमचा सामना करणार्यांसाठी स्लिंग प्रक्रिया आदर्श आहेत जिथे मूत्र बाहेर पडणार नाही याची खात्री करण्यासाठी मूत्रमार्ग (लघवी वाहून नेणारी नलिका) जागी ठेवण्यासाठी कृत्रिम सामग्री किंवा शरीराच्या टिशूंची जाळी वापरली जाते.
●कृत्रिम लघवी स्फिंक्टर (मूत्राशयाचा रस्ता उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी असलेले वर्तुळाकार स्नायू) तुमच्या मूत्राशयाच्या स्फिंक्टर स्नायूंवर पुन्हा नियंत्रण मिळवण्यास मदत करू शकतात.
जर मी मूत्र गळतीचा सामना करत असेन, तर मी माझ्या प्रवासाचे नियोजन कसे करावे?
1. औषधोपचारासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या
तुमच्या सहलीपूर्वी, असंयम लक्षणे व्यवस्थापित करण्यात मदत करणार्या औषधांबद्दल चर्चा करण्यासाठी तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याशी सल्लामसलत करा. तुम्ही तुमच्या प्रवासासाठी योग्य प्रकारे तयार आहात याची खात्री करण्यासाठी दिले जाणारे डोस आणि त्यांच्या वेळा याविषयी मार्गदर्शन करू शकतात.
2. आवश्यक वस्तूंची यादी तयार करा
शोषक उत्पादने, औषधे, कपडे बदलणे आणि फ्रेंड्स अंडरपॅड्स किंवा फ्रेंड्स बेड बाथ टॉवेल्स यांसारख्या स्वच्छताविषयक अत्यावश्यक गोष्टींसह एक यादी तयार करा.
यादी केली असल्याने तुम्ही अत्यावश्यक सामान विसरणार नाही हे सुनिश्चित होते आणि प्रवासादरम्यान तुम्हाला येणारा तणाव दूर होण्यात मदत होते.
3. बाथरूमला किती वेळा जावे लागते त्याची योजना आखा.
तुम्हाला तात्काळ आग्रह वाटत नसला तरीही, तुमच्या प्रवासादरम्यान धोरणात्मक विश्रांतीची योजना करण्यासाठी बाथरूमचे थांबे आधीच पहा.सक्रिय बाथरुम थांबे घेतल्याने अनपेक्षित गळती रोखण्यात मदत होते आणि तुम्ही तुमच्या प्रवासात खात्रीपूर्वक आरामात राहता.
4. प्रवासानुसार स्वच्छता किट सोबत ठेवा
वेट वाईप्स, हँड सॅनिटायझर आणि तुम्हाला आवश्यक असणार्या इतर कोणत्याही वैयक्तिक स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तूंनी एक कॉम्पॅक्ट किट पॅक करा. हे किट तुम्ही जलद स्वच्छता करण्यासाठी आणि कोणत्याही आणीबाणीसाठी तयार आहात याची खात्री देते.
5. तुमच्या बॅगमध्ये अतिरिक्त अंडरवेअर समाविष्ट करा.
तुमच्या कॅरी-ऑन किंवा डे बॅगमध्ये अंडरवियरच्या काही अतिरिक्त जोड्या पॅक करा. तुम्हाला बदल करण्याची आवश्यकता असल्यास हा एक सोपा आणि जलद उपाय आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रवासादरम्यान आराम आणि आत्मविश्वास राखता येईल.
6. प्रौढांच्या डायपर चा साठा करा
विशेषतः लांबच्या प्रवासादरम्यान फ्रेंड्स अडल्ट डायपर चा विचार करा. 16 तासांपर्यंत द्रव शोषून घेण्याची विश्वासार्हता ते प्रदान करतात आणि बाहेर जाताना असंयम व्यवस्थापित करण्यासाठी एक विवेकपूर्ण उपाय असू शकतात.
7. हायड्रेटेड राहा, पण द्रव पदार्थ घेण्याचे प्रमाण व्यवस्थापित करा
हायड्रेशन आवश्यक आहे, परंतु द्रवपदार्थाचे सेवन विशेषतः प्रवासापूर्वी लक्षात ठेवा. कॅफीन आणि आम्लयुक्त पेये यांचे जास्त सेवन टाळा, कारण ते मूत्राशयाला त्रास देऊ शकतात आणि तातडीने जाण्याच्या वाढीस हातभार लावू शकतात.
8. योग्य रीतीने खा
संतुलित आहार ठेवा आणि असंयम लक्षणे वाढवू शकतील असे पदार्थ आणि पेये टाळा. मसालेदार पदार्थ आणि कृत्रिम गोड पदार्थ मूत्राशयाला त्रास देऊ शकतात, म्हणून आपल्या आहाराच्या निवडीबद्दल जागरूक रहा.
जीने के हैं चार दिन, बाकी हैं बेकार दिन! त्यामुळे ताण घेऊ नका आणि प्रवासाचा आनंद घ्या. योग्य नियोजन, योग्य मानसिकता आणि या टिपांचे अनुसरण करून तुम्ही तुमचा प्रवास आत्मविश्वासाने करू शकता, तसेच हे सुनिश्चित करू शकता की असंयम तुमच्या सहलीच्या आनंदात अडथळा आणणार नाही. सुखरूप प्रवास करा!
तुमच्या सहलीसाठी फ्रेंड्सचे कोणते उत्पादन योग्य आहे?
तुम्ही तुमची ट्रॅव्हल बकेट लिस्ट हाताळण्यासाठी तयार आहात का? येथे काही फ्रेंड्स उत्पादने आहेत जी तुमच्या संपूर्ण प्रवासात तुमचा विश्वासू सहकारी असू शकतात!
●UltraThinz Slim Fit Dry Pants for Men and Women -
तुम्ही कामासाठी वांद्रे ते चर्चगेट असा प्रवास करत असाल तर तुम्ही या प्रौढांसाठी असलेल्या डायपर पँट्स वापरून पाहू शकता. या छोट्या प्रवासादरम्यान लोकल ट्रेनमध्ये तुम्हाला गर्दीने ढकलले जात असताना किंवा जेव्हा तुम्ही शिंकता, खोकता, हसता किंवा बसता तेव्हा तुमची लघवी गळती (अंदाजे 10 मिली) होते. तुम्हाला ट्राउझर्स, स्कर्ट किंवा साड्या आवडत असल्यावर तुम्ही तुमच्या कपड्यांच्या आत ही सुपर स्लिम ड्राय पॅण्ट रोज घालू शकता!
●Classic Dry Pants -
जर तुम्ही मुंबई ते पुणे रस्त्याने ३ तासांच्या अंतरावर प्रवास करत असाल तर तुमच्या बॅगेत क्लासिक ड्राय पँट आहे. कदाचित तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल किंवा तुम्हाला लघवी नियंत्रणाच्या समस्या असतील त्यामुळे जर तुम्ही वेळेवर शौचालयात पोहोचू शकला नाहीत तर तुम्हाला प्रत्येक वेळी सुमारे 100 मिली लघवी गळती होऊ शकते.
●Premium Dry Pants -
तुम्ही मुंबई ते गोवा ट्रेनने प्रवास करत असाल जे सुमारे 9 तासांचे अंतर आहे अशावेळी प्रिमियम ड्राय पँट घाला . तुम्हाला लघवी गळतीची मोठी समस्या आहे (अंदाजे ३०० मिली) आणि डायपरमध्ये 2-3 वेळा ती पूर्णपणे रिकामे करावी लागेल.
●Overnight Dry Pants -
फ्रेंड्स ओव्हरनाईट ड्राय पँट्स आंतरराष्ट्रीय फ्लाइट आणि प्रवासासाठी अशा लोकांसाठी बनवल्या जातात ज्यांना त्यांच्या नकळत किंवा ते झोपलेले असताना जास्त लघवी गळतीचा अनुभव येतो किंवा जे लोक सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या त्रासाला सामोरे जाऊ शकत नाहीत.
अडल्ट डायपरबद्दल जाणून घेण्यासारख्या काही गोष्टीः
●योग्य माप :
स्वतःसाठी योग्य मापाचा डायपर शोधणे म्हणजे असंयम विरुद्धची अर्धी लढाई जिंकण्यासारखे आहे! असा योग्य मापाचा डायपर घ्या जो व्यवस्थित बसेल. एक सैल डायपर गळती करू शकतो आणि घट्ट डायपर तुमचा रक्त प्रवाह प्रतिबंधित करू शकतो.
●शोषून घेण्याची योग्यता :
शोषक डायपर तुम्हाला ओलेपणापासून दूर ठेवू शकतो ज्या ओलेपणामुळे बॅक्टेरियाचे संक्रमण, पुरळ आणि अस्वस्थता होऊ शकते. कोणत्याही प्रकारचा ओव्हरफ्लो टाळण्यासाठी आपण अनुभवत असलेल्या गळतीनुसार डायपरच्या वेगवेगळ्या प्रकारांचा विचार करा.
●जडपणा :
2-3 वेळा मोठ्या प्रमाणात गळती झाल्यानंतर डायपर जड होतात! याचे कारण असे की डायपरमधून द्रव निघत नाही, ते फक्त जेलच्या रूपात बदलते आणि ते स्वतःमध्येच ठेवते.
त्यामुळे, तुम्हाला ओलेपणा जाणवत नसला तरी तुमचे डायपर थोडे जड होऊ शकते
- जास्त प्रमाणात डायपरचा वापर : डायपर जास्त प्रमाणात घालणे हा एक वाईट निर्णय आहे. तुमच्या आवडीच्या फ्रेंड्स अडल्ट डायपरवर नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा जेणेकरून तुम्हाला कोणताही गळती किंवा गळती न होता डायपर परिधान करण्याचा आनंददायी अनुभव मिळेल.
●विल्हेवाट लावणे:
डायपरची विल्हेवाट स्वतःवर गुंडाळून किंवा मलविषयक विष्ठा असल्यास शौचालयात प्रथम रिकामी करा. हा रोल केलेला डायपर वर्तमानपत्रात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत झाकून, नंतर कचऱ्याच्या डब्यात टाका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
डायपर घातल्यामुळे पुरळ उठते का?
फ्रेंड्स सारख्या ब्रॅण्डने बनवलेले चांगले डायपर घातल्याने पुरळ उठणार नाही! फ्रेंड्स डायपर हे उच्च-गुणवत्तेच्या कापसाच्या तंतुमय पदार्थाने बनवलेले असतात जे त्वचेला त्रास देत नाहीत किंवा त्वचा खराब करत नाहीत.ते अत्यंत शोषक आहेत, गळती झाली तर ती लगेचच शोषून घेतली जाते आणि त्वचा जास्त काळ ओलेपणाच्या संपर्कात राहणार नाही याची खात्री केली जाते.
डायपर महाग आहेत का?
नाही! फ्रेंड्स डायपर ₹50 पासून सुरू होणाऱ्या आणि प्रति पीस ₹71 पर्यंत विस्तृत किंमतीच्या पंक्तींमध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या गरजेशी जुळणारे डायपर तुम्ही खरेदी करू शकता. गळती आणि गळतीचा मानसिक त्रास सहन करण्यापेक्षा चांगल्या डायपरमध्ये गुंतवणूक करणे अधिक चांगले आहे.
माझ्या लघवीची गळती बिघडू शकते अशा जीवनशैलीच्या समस्या कोणत्या आहेत?
काही जीवनशैलीच्या सवयी जसे की धूम्रपान, मद्यपान, मसालेदार अन्न खाणे, आंबट फळे, कॅफिनयुक्त पदार्थ आणि पेये, तसेच वजन नियंत्रित न करणे यांमुळे लघवीच्या गळतीच्या समस्या आणखी वाढू शकतात.
वाढलेले प्रोस्टेट आकस्मिक होणाऱ्या लघवी गळतीशी कसे जोडले जाते?
प्रोस्टेट ग्रंथी पुरुषांमध्ये मूत्राशयाच्या अगदी खाली स्थित असते आणि मूत्राशयातून (मूत्रमार्ग) मूत्र काढून टाकणाऱ्या नळीच्या वरच्या भागाला वेढते.जेव्हा प्रोस्टेट ग्रंथी मोठी होते तेव्हा ती मूत्रमार्ग पिळून काढू शकते. या दाबले जाण्याच्या क्रियेमुळे मूत्राशय पूर्णपणे रिकामे करण्यात अडचणी येऊ शकतात आणि मूत्राशयाच्या कडांवर दबाव वाढू शकतो. कालांतराने, या वाढलेल्या दाबामुळे विशेषत: खोकला किंवा उचलणे यांसारख्या मूत्राशयावर ताण निर्माण करणाऱ्या, क्रियाकलापांमध्ये अनैच्छिक लघवीची गळती होऊ शकते. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या प्रिय व्यक्तीला लघवी गळती चा त्रास होत असेल तर त्यांना ताबडतोब डॉक्टरांकडे जाण्यास सांगा, कारण वाढलेली प्रोस्टेट यामुळे हे होऊ शकते.
असंयमचा सामना करणे कठीण असू शकते, विशेषत: असे वाटते की आपण स्वतःशीच लढाई लढत आहात.सतत बाथरूम ला जाणे, वेदना आणि लाजिरवाणेपणा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही यामध्ये एकटे नाही आहात. हेल्थकेअर प्रोफेशनल्स आणि तुमच्या प्रिय व्यक्तींकडून मदत घ्या. तुमच्यासारख्याच समस्यांमधून जात असलेले लोक शोधण्यासाठी सपोर्ट ग्रुप्समध्ये सामील व्हा. फ्रेंडस सदैव तिथे आहे, हा प्रवास सोपा करण्यासाठी आणि तुम्हाला मार्गदर्शन आणि समर्थन देण्यासाठी आमच्या टोल-फ्री नंबरवर फक्त एका कॉलच्या अंतरावर तुमच्यासाठी नेहमीच आहे. 1800 266 0640 😊